काँग्रेसच्या निर्णायक पुढाकाराला यश :
हिंगोली गेट–वाजेगाव पुला पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीला वेग; प्रशासन तातडीने हलले


नांदेड, दि. १६, नांदेड शहरातील वाढत्या वाहतुकीसह नागरिकांना त्रासदायक ठरत असलेले हिंगोली गेट ते वाजेगाव पुला पर्यंतचे रस्त्यावरील मोठे खड्डे अखेर बुजवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील दयनीय परिस्थितीमुळे अपघातांची शक्यता वाढली होती. या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती.
काँग्रेसचा लोकहिताचा लढा यशस्वी नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्वात महत्त्वाच्या मार्गाची दुरुस्ती तातडीने करावी, या मागणीसाठी एक विस्तृत निवेदन नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. हे निवेदन खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या सूचनांनुसार तयार केले गेले.
निवेदनामध्ये स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले होते की,
“जर १५ दिवसांच्या आत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही, तर काँग्रेसकडून आंदोलन छेडले जाईल.”या इशाऱ्याने प्रशासनास वेळेत जाग आली आणि तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरुस्तीचे आदेश देण्यात आले.
प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची गंभीर दखल घेतली. काही दिवसांपासून या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे आणि समतल करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
नागरिकांमध्ये यामुळे मोठा आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे, कारण हा मार्ग दररोज हजारो वाहनांसाठी मुख्य प्रवेशद्वार आहे.
पूर्वीही काँग्रेसचा उल्लेखनीय पुढाकार या मागणीपूर्वी देगलूर नाका परिसरातील खड्ड्यांची दुरुस्ती माजी उपमहापौर अब्दुल गफार साहेब यांनी स्वतःच्या खर्चाने केली होती. त्यांच्या या पुढाकाराचे त्यावेळी शहरभर कौतुक झाले होते. आता पुन्हा काँग्रेसने केलेल्या लढ्यामुळे प्रशासन हालचालीला लागल्याचे दिसून येते.

निवेदन देताना उपस्थित काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते
निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यात प्रमुख नावांचा समावेश—
माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, माजी नगरसेवक अजीज कुरेशी, सय्यद फसी ,सय्यद शेर अली, मुन्तजीबोद्दीन, हबीब बागवान, रहीम अहमद खान, सय्यद शोएब, मोहम्मद नासेर, मोहम्मद लतीफ, रमेश गोडबोले, हबीब बावजीर, अब्दुल मुख्तार(बल्लू सेट), वहाब भाई
सर्वांनी एकमुखाने प्रशासनाला लोकहिताचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली होती.
नागरिकांकडून काँग्रेसचे आभार रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात होताच स्थानिक नागरिकांनी महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर अब्दुल गफार, तसेच निवेदन देणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे आभार मानले.
नागरिकांमध्ये असा सूर होता की- “लोकप्रतिनिधींनी वेळेवर प्रश्न उचलल्यास प्रशासनासही कामाला भाग पाडता येते.”



