जिल्हा परिषदेत 25 नोव्हेंबर रोजी पेंशन अदालतीचे आयोजन


नांदेड,18- जिल्हा परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांच्या निवृत्तीविषक
तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अदालात जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहहात मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
सेवानिवृत्तीवेळेस येणाऱ्या विविध प्रशासकीय अडचणी, प्रलंबित प्रकरणे, निवृत्तीवेतन प्रस्ताव, जीपीएफ, ग्रॅच्युइटी, कम्युटेशन तसेच इतर लाभांशी संबंधित तक्रारी प्रत्यक्ष ऐकून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या उद्देशाने ही अदालात घेण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी या अदालतीस उपस्थित राहून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवून तक्रारदारांना आवश्यक मार्गदर्शनही करणार आहेत.
संबंधित सेवानिवृत्त शिक्षक व कर्मऱ्यांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहून पेंशन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी केले आहे.




