शिक्षण

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड, दि. 18 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा-2025 रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर दुपारी 2.30 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 51 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार या परीक्षा केंद्रापासून शंभर मिटरच्या परिसरात रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यक्तीरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.

तसेच परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या शंभर मिटरपर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास, त्याचप्रमाणे वर दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी., आय.एस.डी.,भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *