क्राईम

दुहेरी हत्याकांड उकल : स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची धडाकेबाज कामगिरी -12 तासांत दोघे आरोपी अटकेत

 

माहूर | पोलीस स्टेशन माहूर हद्दीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी फक्त 12 तासांत उघडकीस आणत दोघा आरोपींना जेरबंद केले आहे.

अटक आरोपी : दत्ता सुरेश लिंगलवार (वय 38, रा. सदोबा सावळी, ता. आर्णी, जि. यवतमाळ), गजानन गंगाराम येरजवार (वय 41, रा. गंगाजीनगर, करंजी, ता. माहूर, जि. नांदेड)

जप्त मुद्देमाल : गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल दोन मोबाईल फोन दि. 20/11/2025 रोजी पाचोंदा येथे कापूस वेचणीला गेलेल्या अंतकलाबाई अशोक अडागळे (55) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (50) यांची गळा दाबून हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी माहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथकांची नियुक्ती करण्यात आली. एक टीम आदिलाबाद, एक यवतमाळ तर दोन टीम माहूर व किनवट परिसरात पाठवण्यात आल्या.
संशयित आरोपीचे स्केच पुणे येथील तज्ञांच्या मदतीने व्हिडीओ कॉलद्वारे तयार करण्यात आले.

दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व त्यांच्या पथकास माहिती मिळाली की दत्ता लिंगलवार हा आपला नातेवाईकाच्या शेतातील अखाड्यावर लपला आहे. सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व दुसरा आरोपी गजानन येरजवार याचा ठावठिकाणा सांगितला. पोलिसांनी त्यालाही तत्काळ अटक केली.

दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.या गुन्हा उकल करण्यात यवतमाळ पोलीस दलाने मोलाचे सहकार्य केले असल्याचे पोलीसांनी सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आणि त्यांच्या पथकाची ही धडाकेबाज कामगिरी सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *