गोदावरी नदीपात्रातील बेकायदेशीर काळ्या रेतीचे उत्खनन रोखण्यासाठी संयुक्त कारवाई – 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड | पोलीस स्टेशन कुंटुर, उमरी व महसुल विभाग नायगाव–उमरी यांच्या संयुक्त पथकाने गोदावरी नदीपात्रात तराफ्याच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध काळी रेती उत्खनन कारवाईवर धडक टाकून एकूण 3,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
जप्त मुद्देमाल 1,00,000 : अंदाजे 20 ब्रास काळी रेती (प्रति ब्रास 5,000 रुपये) 50,000 : एक तराफा – नदी पात्रात (हा जागेवरच डिझेल–पेट्रोलने नष्ट) – पोलीस स्टेशन कुंटुर, 1,50,000 : तीन तराफे – पोलीस स्टेशन उमरी व महसुल विभाग उमरी यांनी जागेवरच नष्ट केले. जप्त एकूण मुद्देमाल : 3,00,000 रुपये

पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश-आउट अंतर्गत वाळू माफियांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दि. 20/11/2025 रोजी दुपारी 2.30 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल डी. भोसले यांना गोदावरी नदीपात्र, मौजा हुस्सा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी तहसीलदार, नायगावसुद्धा पथकासह तेथे पोहोचले.
पोलिस व महसुल विभाग येत असल्याचे समजताच उत्खनन करणारे अज्ञात इसम पळून गेले. तपासणीदरम्यान 20 ब्रास काळी रेती साठवलेली आढळली, तसेच कुंटुर हद्दीत एक तराफा मिळून आला. हा तराफा डिझेल-पेट्रोलने नष्ट करण्यात आला.

त्यानंतर उमरी हद्दीतही अशाच प्रकारे तीन तराफे दिसून आल्याने, पो.स्टे. उमरी व महसुल विभाग उमरी यांनीही ते जागेवरच नष्ट केले.
या संयुक्त कारवाईत शाम पानेगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली), श्रीमती धम्मप्रिया गायकवाड, तहसीलदार (नायगाव), सपोनि. विशाल भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मंडळ अधिकारी रोहिदास पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.



