शहर

वजीराबाद व्यापारी क्षेत्रात कृष्णा सिटी मॉलचे भव्य उद्घाटन

वजीराबादच्या प्रमुख व्यावसायिक परिसरात, मारवाडी धर्मशाळेसमोर उभारण्यात आलेल्या कृष्णा सिटी मॉलचे आज अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.

रूप संगम मेन्स वेअर ग्रुपचे मालक मुकेश रंगनानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या आकर्षक मॉलचे शुभारंभ गुरुद्वाराचे मुख्य पुजारी बाबा कुलवंत सिंह जी व मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांच्या हस्ते रिबन कापून आणि दीप प्रज्वलन करून संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा सिटी मॉलची शोभा अधिक खुलवली.

या विशेष प्रसंगी सामाजिक, राजकीय तसेच मित्रपरिवारातील अनेक मान्यवरांनी मुकेश रंगनानी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कृष्णा सिटी मॉलमध्ये कॉस्मेटिक, रेडिमेड, लेडीज वेअर, चिल्ड्रन वेअर अशा अनेक आकर्षक दुकाने असून खरेदीसाठी हे मॉल आता आधुनिक आणि आकर्षक रूपात नागरिकांचे स्वागत करण्यास सज्ज आहे.

समारंभात उपस्थित पाहुण्यांचे नारायणदास मंघाराम रंगनानी, जोगेंद्र नारायणदास रंगनानी, मुकेश नारायणदास रंगनानी आणि जगदीश नारायणदास रंगनानी यांनी मनःपूर्वक स्वागत केले.
कृष्णा सिटी मॉल – खरेदीचे आधुनिक, आकर्षक आणि नवे गंतव्य!

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *