रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
एकाच वेळी 8 घाटांवर छापे; 37 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड: गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी 8 वेगवेगळ्या घाटांवर छापे टाकत एकूण 37,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नदीपात्रातील अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात उघडकीस आला आहे.
अटक व संशयित आरोपी
1. संतोष हंबर्डे, रा. विष्णुपुरी, नांदेड (मालक)
2. सजीवन बिन पि. हारुल बिन, व्यवसाय मजुरी, रा. लक्ष्मण डेरा, चक्की जि. बकसर (बिहार)
3. वकील पि. मिश्री सहनी, व्यवसाय मजुरी, रा. जाता, ता. गायघाट, जि. मुजफ्फरपूर (बिहार)
4. इतर 3 आरोपी पोलिसांना पाहून पसार

जप्त केलेला मुद्देमाल — एकूण किंमत : 37,22,000 रुपये
10 ब्रास रेती – 50,000 रुपये
54 तराफे (पाण्यात तरंगणारे) – 27,00,000 रुपये
3 इंजिने – 9,00,000 रुपये
12 लोखंडी ड्रम – 12,000 रुपये
15 प्लास्टिक ड्रम – 9,000 रुपये
17 लोखंडी पाईप – 51,000 रुपये
त्यापैकी काही तराफे घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल जप्त करून पोलीस ताब्यात ठेवण्यात आला आहे.अवैध गौण खनिज (रेती) उपसा व वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष आदेश दिले होते. मिळालेल्या गुन्हेगारी माहितीनुसार गोदावरी नदीपात्रात लपून–छपून रेती उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानुसार सकाळी 9 वाजता पोलीस पथकाने कल्लाळ येथून बोटींसह नदीपात्रात प्रवेश केला. पथकात आवश्यक साहित्य, डिझेल–पेट्रोल, अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता. त्यानंतर पथकाने काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव, गंगाबेट या एकूण आठ घाटांवर एकाच वेळी छापेमारी केली.

छाप्याच्या वेळी आरोपी इंजिन, तराफे आणि मजदूरांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करत असल्याचे आढळले. तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित 3 आरोपी पळून गेले.एकूण 37 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



