जिला

ब्रेकिंग न्यूज – नांदेड जिल्ह्यात मुखेड–धर्माबाद नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया नव्याने; २० डिसेंबरला मतदान

 

नांदेड – राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन अपील दाखल असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून मुखेड आणि धर्माबाद नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे.

 

तसेच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगरपरिषदेतील प्रत्येकी एका प्रभागातील निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे.

 

नवी तारीख मतदान : २० डिसेंबर २०२५ मतमोजणी : २१ डिसेंबर २०२५

 

का पुढे ढकलल्या निवडणुका?

मुखेड व धर्माबाद नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासंदर्भात अपील प्रलंबित असल्याने संपूर्ण निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तर भोकर (प्रभाग १-B), कुंडलवाडी (प्रभाग ३-A) आणि लोहा (प्रभाग ५-B) येथील संबंधित प्रभागांवर अपील प्रलंबित असल्यामुळे तेथील मतदान स्थगित करण्यात आले आहे.

 

नवीन कार्यक्रम (मुखेड आणि धर्माबाद)

४ डिसेंबर: निवडणूक कार्यक्रम जाहीर

८ डिसेंबर: नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत

११ डिसेंबर: निवडणूक चिन्ह वाटप

२० डिसेंबर: मतदान (सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०)

२१ डिसेंबर: मतमोजणी

 

राज्य आयोगाचे आदेश

२२ नोव्हेंबर २०२५ नंतर जिल्हा न्यायालयाकडून निर्णय मिळालेल्या अपीलांच्या प्रकरणांमध्ये

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *