जिला

नांदेडमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या नावाखाली २ ते ३ हजारांची अवैध वसुली; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

 

नांदेड शहरात महावितरणतर्फे घरांवर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामादरम्यान विजमीटर बसविणाऱ्या परवटे इलेक्ट्रिशियनकडून घरमालकांकडून निष्काळजीपणे व अवैधरीत्या पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इलेक्ट्रिशियन अनेक घरांत जाऊन मीटर फिटिंगच्या नावाखाली २ हजार ते ३ हजार रुपये घेत आहेत. “तुमचा मीटर बंद आहे… आम्ही साहेबांना सांगत नाही, २ हजार द्या, नाहीतर पेनल्टी लागेल,” असे सांगून ते घरमालकांना भीती दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भितीपोटी काही नागरिकांनी पैसे देण्याची वेळ येत आहे.

या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित इलेक्ट्रिशियनवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्यांना हा टेंडर देण्यात आला आहे, त्या कंत्राटदारांवरदेखील कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

महावितरणच्या नियमानुसार घरमालकाच्या उपस्थितीतच मीटर बदलणे बंधनकारक आहे. जुना मीटर काढणे, नवा मीटर बसवणे आणि काढलेला जुना मीटर अधिकृत कार्यालयात जमा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. जबरदस्तीने मीटर बसवणे किंवा पेनल्टीच्या नावाखाली पैसे घेणे हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

नागरिकांनी महावितरण व संबंधित अधिकाऱ्यांनी या अनधिकृत वसुलीवर तात्काळ अंकुश ठेवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *