स्पोर्ट्स

अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धा 20 ते 27 डिसेम्बर दरम्यान

नामवंत 16 राष्ट्रीय संघ करणार सहभाग; जर्मनप्रीतसिंघ यांची उद्धघाटन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती

 

नांदेड दि. 7 डिसेम्बर : देशात अति प्रतिष्ठीत मानली जाणारी श्री गुरु गोबिंद सिंघजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेस येत्या 20 डिसेम्बर पासून सुरुवात होत आहे अशी माहिती शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सरदार गुरमीत सिंघ नवाब ( डिंपल ) यांनी येथे दिली.

शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वास समर्पित या राष्ट्रीय स्पर्धा 27 डिसेम्बर पर्यंत चालणार आहेत. यंदा स्पर्धेचा 52 वां वर्ष असून राष्ट्रीय खेळ हॉकीला प्रोत्साहित करणाऱ्या आणी नांदेडच्या धरतीवर नवीन उत्कृष्ट खेळाडू तयार होण्यास ही स्पर्धा मोलाची भूमिका पार पाडत आहे.


सरदार गुरमीत यांनी पुढे माहिती दिली की, संत महात्मा यांच्या आशीर्वादाने आणी नांदेडच्या विविध संस्था व प्रोत्साहनप्रेमी व्यक्तिँच्या सहकार्याने दरवर्षी या स्पर्धा घेण्यात येतात. यंदाही राष्ट्रीयस्तरावर व्यापकरितिया या स्पर्धा पार पडणार आहेत. यावर्षी एकूण सोळा राष्ट्रीय संघाचा सहभाग स्पर्धेत राहणार आहे. त्यात, बीएसएफ जालंधर, पंजाब पोलीस, एसजीपीसी पंजाब, आर्मी इलेवन जालंधर, ए.जी. दिल्ली, आय. टी. दिल्ली, ए. जी. नागपुर, बिलासपुर रेल्वे, ऑरेंज सिटी नागपुर, एमपीटी मुंबई, यूनियन बँक मुंबई, सैफई इटावा, ए. जी. हैदराबाद, कर्नाटक हॉकी सह नांदेडचे युथ खालसा क्लब आणी चार साहबजादे हॉकी टीम सहभागी होणार आहे.

दि. 20 डिसेम्बर रोजी खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम नांदेड मैदानावर हॉकी स्पर्धेचे उद्घाटन होईल. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणी ओल्याम्पीयन सरदार जर्मनप्रीतसिंघ हा आवर्जूनपणे हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित असणार आहे. या स्पर्धेत देखील नामवंत आणी राष्ट्रीय खेळाडू आपल्या खेळाचे प्रदर्शन करतील. वरील स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सरदार गुरमीत सिंघ नवाब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *