बेलापूर गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचा सेवाभाव आदर्श घेण्यासारखा – पंढरीनाथ बोकारे

नांदेड : 13 Dec. नवी मुंबई भागातील बेलापूर गुरुद्वारा प्रबंधक कमिटी चा सेवाभाव आदर्श घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी केले. नानक साई फाऊंडेशन नांदेडचा संत नामदेव जीवन गौरव पुरस्कार पनवेल येथील आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे पनवेल येथे समारंभपूर्वक वितरण झाले.

दरम्यान हा कार्यक्रम आटोपून वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी नवी मुंबई येथील बेलापूर गुरुद्वारा ला भेट दिली. त्यांचे गुरुद्वारा प्रबंधक कमिटी ने स्वागत केले. त्यांचा सेवाभाव अनुभऊन आम्ही धन्य झालो अशी भावना प्रतिपादन नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केली. प्रबंधक कमिटी द्वारा बोकारे व अयुब पठाण यांचा सत्कार केला. गुरुद्वारा प्रबंधक कमिटी चे अध्यक्ष सरदार जसबिर सिंघ, सरदार बलविंदरसिंघ घुमान, सरदार नवतेजसिंघ पम्मीभाई थिंड, सरदार बुटा सिंघ,सरदार गुरुप्रित्तसिंघ घुमान सरदार गज्जनसिंघ हे उपस्थित होते.
अंबरनाथ टाइम्स तर्फे सत्कार.. अंबरनाथ : ठाणे व रायगड येथून प्रकाशित होणारे दै.अंबरनाथ टाइम्स च्या वतीने ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे व सत्य मराठी चे संपादक अयुब खान पठाण यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे व रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणारे लोकप्रिय दैनिक अंबरनाथ टाइम्स च्या कार्यालयाला बोकारे व अयुब खान पठाण यांनी भेट दिली.
दैनिक अंबरनाथ टाइम्स चे संपादक श्री कमलाकर सूर्यवंशी व राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचे आदर तिथ केले. अंबरनाथ टाइम्स चा संघर्षशील नेतृत्व अन कर्तत्व ची गौरवगाथा हा विशेष अंक भेट दिला. बोकारे व अयुब खान पठाण हे अंबरनाथ व उल्हासनगर येथील एका कार्यक्रमासाठी आलेले आहेत.



