शिक्षण

प्रा. किरण भोसले यांना पीएचडी पदवी जाहीर

नांदेड दि.12 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित यशवंतराव चव्हाण (KMC) महाविद्यालयातील हिंदी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक किरण भोसले यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारे पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. त्यांनी “हिंदी तथा मराठी मे लिखित भगवान बुद्ध की जीवनीयों का तुलनात्मक अध्ययन” या महत्त्वपूर्ण विषयावर दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील प्रा. डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विषयामध्ये संशोधन कार्य पूर्ण केले.

यावेळी आयोजित मौखिक परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय मुरूमकर हे बहिस्थ परीक्षक म्हणून तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या भाषा संकुलाचे विभाग प्रमुख डॉ. दिलीप चव्हाण हे विद्यापीठ प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

मौखिक परीक्षेसाठी प्राचार्य शेखर घुंगरवार यांच्यासह भाषा संकुलातील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक यांचीही प्रमुख उपस्थिती होती डॉ. किरण सदानंद भोसले यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे डॉ. संतोष भोसले, डॉ. बाबासाहेब भुकतरे, आप्तस्वकीय, मित्र मंडळी आणि चळवळीतील कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *