शहर

अनवर अहमद यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून प्रभाग २ व ५ मधून उमेदवारीसाठी अर्ज दाखल

 

नांदेड : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) कडून प्रभाग क्रमांक २ तरोडा बु. (सर्वसाधारण महिला) तसेच प्रभाग क्रमांक ५ भाग्यनगर (सर्वसाधारण पुरुष) या दोन महत्त्वाच्या प्रभागांमधून उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज सादर करण्यात आले आहेत.

शिवसेना पक्ष कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात हे अर्ज अधिकृतपणे दाखल करण्यात आले. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख स. दर्शन सिंग सिध्दु, शहरप्रमुख संतोष मादनवाड, उमेश डिंगे, ओबीसी विभागाचे प्रमुख गणेश (अप्पा) हलकुटे तसेच राजेश भैया चव्हाण यांच्याकडे अर्ज सुपूर्द करण्यात आले.

यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख अनवर अहमद (नांदेड) यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून दोन्ही प्रभागांसाठी उमेदवारीची अधिकृत मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रियपणे कार्यरत असून, तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे. शहरातील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण व अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा आपला मानस असल्याचे अनवर अहमद यांनी सांगितले.

शिवसेना (शिंदे गट) ही सर्वसामान्य नागरिकांची पक्ष असल्याने, स्थानिक पातळीवर मजबूत व कार्यक्षम नेतृत्व देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने अनुभवी व संघटनेशी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या अर्ज सादरीकरणावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *