नागपुर, दिल्ली, संभाजीनगर आणी पंजाब पोलीस संघ विजयी!

नांदेड दि. 21 डिसेम्बर : श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली, संभाजीनगर, पंजाब पोलीस आणी नागपुरच्या दोन संघ विजयी ठरले.
रविवारी सकाळी स्पर्धेचा पाचवा सामना ऑरेंज सिटी नागपुर आणी अश्विनी क्लब मैसूर यांच्यात खेळला गेला. नागपुर संघाने हा सामना 4 विरुद्ध 0 असा जिंकला. खेळाच्या 25 व्या मिनिटास नागपुरच्या श्रेयस धुपे याने पेनल्टी कार्नरच्या संधीचा लाभ घेत गोल नोंदवला. त्यानंतर त्याने 49 मिनिटाला मैदानी गोल करत संघास पुढे नेले. खेळाच्या 53 व्या मिनिटाला अनीस मोहम्मद याने तर 59 मिनिटाला शेख अरीफ मोहम्मद याने गोल केला.

आजच्या सहाव्या सामन्यात सी.बी.डी.टी. दिल्ली संघाने नांदेडच्या चार साहिबजादे हॉकी अकैडमी संघाचा 9 विरुद्ध 0 असा धुव्वा उडवला. दिल्ली संघातर्फे अजय शर्मा, नचप्पा आय. आर. आणी समीर खान याने प्रत्येकी दोन गोल केले. विकास चौधरी, संजीव अलमानी आणी विकास कुमार याने प्रत्येकी एक गोल केला. तर नांदेड संघाला गोल करता आले नाही.
आज झालेल्या सातव्या सामन्यात ए.जी.नागपुर संघाने इलेवन स्टार अमरावती संघाला 5 विरुद्ध 1 गोल अंतराने नमविले. नागपुरच्या अमीदखान पठान याने 20 मिनिटात चार गोल करत स्वःताचे वर्चस्व सिद्ध केले. तर खेळाच्या सुरुवातीला सागर नंदा याने तिसऱ्या मिनिटाला गोल करत संघास चांगली सुरुवात करुन दिली. तर अमरावती संघाच्या मोहित खुशवा याने खेळाच्या 58 मिनिटाला एक गोल केले.
आठव्या क्रमांकाचा सामना साईं संभाजीनगर हॉकी संघ आणी सूफियाना हॉकी क्लब अमरावती यांच्यात खेळला गेला. संभाजीनगर संघाने हा सामना एकतर्फा ठरवत 7 विरुद्ध 0 गोल अंतराने अमरावती संघाचा धुव्वा उडविला. संभाजीनगर संघाच्या भारत याने दोन गोल केले. पण खेळाच्या दुसऱ्याच मिनिटाला करण तोशारे याने सुरुवातीचा गोल करत खाते उघडले. एका मिनिटाच्या अंतराने राज पवार याने गोल नोंदवला. नंतर दानिश मोहम्मद, मनीष चौधरी आणी फराज तडवी यांनी गोल केलेत. अमरावती संघास एकही गोल करता आले नाही.
आजचा नववा क्रमांकाचा सामना पंजाब पोलीस विरुद्ध खालसा युथ क्लब नांदेड संघात खेळला गेला. पंजाब पोलीस संघाने हा सामना 3 विरुद्ध 1 गोल अंतराने जिंकला. बलाढ्य पंजाब पोलीस संघास नांदेडच्या संघाने चांगलेच आव्हान दिले पण संधी गामावल्याने नांदेड संघास सामना गमवावा लागला. संघर्षपूर्ण सामन्यात पंजाब पोलीसने खेळाच्या 26 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकचा गोल मध्ये रूपांतर केले. हा गोल हरदीप सहमी सिंघ याने केला. नंतर सिमरनजीतसिंघ याने 41 व्या मिनिटाला मैदानी गोल केले. खालसा यूथ क्लब ने प्रतिउत्तर देत 43 व्या मिनिटाला पेनल्टी कार्नर मध्ये गोल केले. हा गोल गोपाल मेटकर याने केले.
दोन्ही संघाँनी गोल करण्यासाठी अनेक हल्ले चढवले. पण खेळाच्या 57 व्या मिनिटाला गुरतेज सिंघ याने मैदानी गोल करत विजय निर्णायक केले. आजच्या सामन्यात हॉकी इंडिया तर्फे पंच म्हणून विकास सिंग, वाडीवाला मोहम्मद जैद जुनेद, रोहित कुमार, विजयकुमार मांगनूरकर, आनु राज, इनास डेरिक फर्नीण्डेज यांनी जवाबदारी पार पाडली. तर हॉकी कमिटीचे प्रमुख सरदार गुरमीतसिंग डिंपल नवाब यानी सुरेख नियोजन केले.



