स्पोर्ट्स

गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत खेळतील आठ बलाढ्य हॉकी संघ!

ए.जी.ए.पी. & टी.एस. संघाचा नांदेडवर दणदणित विजय

 

रविंद्रसिंघ मोदी / नांदेड दि. 24 डिसेम्बर : अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघ जी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेत आज लीग प्रणालीचे सामने सम्पूष्टांस आले असून गुरुवार पासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. क्वार्टर फायनलच्या सामन्यात आठ बलाढ्य संघ खेळणार असून उद्या पासून नांदेडकरांना वेगवान हॉकी खेळ पाहण्याचा योग उपलब्ध होणार आहे. आर्मी इलेवन जालंधर, एमपीटी मुंबई, बीएसएफ जालंधर, संभाजी नगर, पंजाब पोलीस, ए.जी. नागपुर, ए.जी. हैदराबाद आणी ऑरेंज सिटी नागपुर

या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता पहिला उपांत्यपूर्व सामना पंजाब पोलीस विरुद्ध ए.जी. नागपुर संघा दरम्यान खेळला जाणार आहे. तर दूसरा सामना एमपीटी मुंबई विरुद्ध आर्मी इलेवन जालंधर यांच्यात होईल. तीसरा सामना बीएसएफ जालंधर विरुद्ध संभाजी नगर आणी ए.जी. हैदराबाद विरुद्ध ऑरेंज सिटी नागपुर दरम्यान खेळला जाईल. अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक सरदार गुरमीत सिंघ (डिंपल) नवाब यांनी दिली.

बुधवारी सकाळी खेळल्या गेलेल्या पहिल्या हॉकी सामन्यात ए.जी.ए.पी & टीएस सिकन्दराबाद संघाने नांदेडच्या चार साहिबजादा हॉकी अकाडेमी संघाचा 17 विरुद्ध 0 गोल अंतराने दारुण पराभव केला. सिकंदराबाद संघाच्या तालीब शाह याने सामन्यात व्यक्तिगत 7 गोलांचा पाऊस पाडला. तर लोकेश कोने, साईं विनीत आणी मणिकांता यांनी प्रत्येकी तीन – तीन गोल केलेत. नांदेडचा संघ गोल करण्यात अपयशी ठरला.

आजच्या दुसऱ्या सामन्यात खालसा यूथ क्लब नांदेड संघाने 3 विरुद्ध 1 गोल अंतराने सूफियाना हॉकी क्लब अमरावती संघाला नमवले. खालसा यूथ क्लब तर्फे मनप्रीत सिंघ चाहल, रामकिशना बोडिगम आणी श्रीनिवास कांबळे यांनी गोल केले तर अमरावती तर्फे अमीर खान याने गोल साधला. तीसरा सामना बीएसएफ जालंधर विरुद्ध इटारसी असा रंगला. जालंधर ने 5 विरुद्ध 2 गोल अंतराने सामना मिळवला. त्यानंतर एमपीटी मुंबई विरुद्ध दिल्ली सामना खेळण्यात आला. मुंबईने 3 विरुद्ध 1 अंतराने सामना जिंकला. आजचा शेवटचा सामना आर्मी इलेवन विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर संघात खेळला गेला. अति संघर्षपूर्ण सामन्यात आर्मी संघाने 1 विरुद्ध 0 गोल अंतराने सामना जिंकला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *