अवैध जुगार अड्यावर छापा, २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने अवैध जुगार अड्यावर छापा टाकत २ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बालाजी शेषेराव भंगारे (वय २९, व्यवसाय मजुरी, रा. पंकज नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड), राहुल शंकर हैबते (वय ३४, व्यवसाय मिस्त्री काम, रा. नवीन कौठा, नांदेड), शेख अब्दुल बशीर (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. रहीमपुर, नांदेड), विशाल राजू भोकरे (वय २६, व्यवसाय चालक, रा. नवीन कौठा, नांदेड), मयूर संतोष शिंदे (वय २०, व्यवसाय मजुरी, रा. श्रीराम चौक, धनेगाव, नांदेड), लिंगू मसाजी पवार (वय ३६, व्यवसाय मजुरी, रा. बळीरामपूर, नांदेड) यांचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंकज नगर, धनेगाव येथील बालाजी भंगारे यांच्या घराशेजारी ‘तिर्रट’ नावाच्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला. या छाप्यात वरील आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले.
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम १६ हजार ५०० रुपये, ५ मोबाईल फोन, २ मोटारसायकली तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण २.६५ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



