गाडी क्र. 16003/16004 चेन्नई सेन्ट्रल – नगरसोल – चेन्नई सेन्ट्रल मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून आणि वेटिंग यादीतील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, खालील गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक कुठून कुठे वाढविण्यात येणारे डबे कालावधी
16003 चेन्नई सेन्ट्रल – नगरसोल तृतीय श्रेणी वातानुकुलीत- 02 04.01.2026 ते 01.02.2026
16004 नगरसोल – चेन्नई सेन्ट्रल तृतीय श्रेणी वातानुकुलीत- 02 05.01.2026 ते 02.02.2026
या बदलामुळे प्रवाशांना अधिक क्षमता उपलब्ध होणार असून गर्दी कमी होण्यास मदत होईल.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ही कार्यवाही हाती घेतली आहे.



