शहर

नांदेड वाघाळा मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ६ ब मध्ये सुशिक्षित अपक्ष उमेदवार इंजिनिअर शेख वसीम शेख हकीम यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ ब, ओबीसी प्रवर्गातून परवर्गातील सुशिक्षित अपक्ष उमेदवार म्हणून इंजिनिअर शेख वसीम शेख हकीम हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना प्रभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

इंजिनिअर शेख वसीम शेख हकीम हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सातत्याने समाजकार्य करत आहेत. युवकांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, शैक्षणिक अडचणींवर उपाय, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक मदत त्यांनी वेळोवेळी केली आहे.

कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था, वैद्यकीय मदत व औषधोपचार उपलब्ध करून देत मोलाचे सामाजिक कार्य केले. त्यांच्या या कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.

‘टीम आजाद सोशल ॲक्टिव्हेट’ या माध्यमातून ते विद्यार्थी, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून अनेक गरजू नागरिकांना मदत करत आहेत.

सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणारे सुशिक्षित अपक्ष उमेदवार म्हणून इंजिनिअर शेख वसीम शेख हकीम यांना प्रभाग क्रमांक ६ ब मधील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत जोडले जात आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *