जिला

मिलिंद व्यवहारे यांना ह्यूमन राइट्स पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 

नांदेड, ८- नांदेड जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, सकारात्मक व जनहितकारी उपक्रम यांची माहिती सातत्याने समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ह्यूमन राइट्स वर्कर पत्रकारिता पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.


हा पुरस्कार ५ जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी दिलीपसिंह हजारी, डिजिटल मीडियाचे सिद्धार्थ भैय्या भोकरे, दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

मिलिंद व्यवहारे यांनी आपल्या लेखनातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसह जिल्हा परिषदेच्या उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी केली आहे. स्वच्छ महाराष्ट्र व्हॉट्सॲप रेडिओच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेबाबत त्यांनी राज्यभर प्रभावी जनजागृती केली आहे. तसेच दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची व्यापक प्रसिद्धी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

यात्रेदरम्यान दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने मीडिया सेंटरची स्थापना करण्यात येते. लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती तसेच मीडिया सेंटरमध्येही त्यांनी जबाबदारीने काम केले आहे.
त्यांच्या या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत मिमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ह्यूमन राइट्स वर्कर पत्रकारिता पुरस्कार मिलिंद व्यवहारे यांना प्रदान करण्यात आला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *