प्रा. शुद्धोधन गायकवाड यांना पीएच.डी.

नांदेड,६- बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयातील पर्यवेक्षक प्रा. शुद्धोधन गायकवाड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने पीएच.डी. ( विद्यावाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
Synthesis and Study of Gas Sensing Properties of Some Nano-Crystalline Ferrites हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. संशोधक मार्गदर्शक प्रो. डॉ संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. यावेळी भौतिक शास्त्र संकुलाचे प्रमुख प्रो .डॉ. राजाराम माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रो. डॉ. सोपान राठोड यांचे सहकार्य लाभले. संकुलातील प्रो. डॉ. माधव बोगले,

प्रो. डॉ. अरविंद सरोदे, प्रो. डॉ. श्याम गोरे, प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे, डॉ. शिंदे, सुभाष गायकवाड, ऋषिकेश सूर्यवंशी यांचेही सहकार्य लाभले. पानसरे महाविद्यालयाचे अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, सचिव सुनील बेजगमवार, उपाध्यक्ष राजेश्वर उत्तरवार, संचालक प्रकाश पाटील अर्जुने, प्रभारी प्राचार्य डॉ. शिद्धोधन कांबळे, उपप्राचार्य डॉ. गोविंद चौधरी, उपप्राचार्य डॉ. गोपाळ चौधरी, स्टाफ सेक्रेटरी प्रा. हणमंत मटके, कार्यालयीन अधीक्षक राजू लाभशेटवार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन नांदेड आणि मैत्रेय मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीनेही त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.



