हेल्थ

कामठा येथे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी

 

नांदेड,८- अर्धापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव अंतर्गत आरोग्य उपकेंद्र कामठा बु. येथे कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाले.

या शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम सावंत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. डाढाळे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. कोळेकर तसेच विस्तार अधिकारी डॉ. एस. पी. गोखले उपस्थित होते. तपासणीसाठी आलेल्या लाभार्थ्यांना कर्करोग आजाराविषयी माहिती देत वेळेवर तपासणीचे महत्त्व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी स्पष्ट केले.

कामठा येथे झालेल्या कर्करोग तपासणी शिबिरात एकूण ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मुख कर्करोग तपासणी ९०, स्तन कर्करोग तपासणी ३९, गर्भाशयमुख कर्करोग २४ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच एकूण १३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.

कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहायक अरुण गादगे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. लिना बनसोडे, बी.सी.एम. फेरोज शेख, एजाज शेख, उपकेंद्रातील ए.एन.एम. भाले व खुळे सिस्टर, एम.पी.डब्ल्यू. मांजरमकर, उपकेंद्रातील सर्व कर्मचारी, आशाताई व अंगणवाडी सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *