जिला

धर्माबाद नगरपालिकेत संगीताताई बोलमवाड नगराध्यक्ष, शंकर बोलमवाड उपनगराध्यक्ष

धर्माबाद | प्रतिनिधी – अनंतोजी कालीदास

धर्माबाद नगरपालिकेत मंगळवार, 11 जानेवारी रोजी एक ऐतिहासिक घडामोड घडणार असून मराठवाडा जनहित पार्टीच्या श्रीमती संगीताताई बोलमवाड या नगराध्यक्ष (महापौर) पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्याच दिवशी उपनगराध्यक्ष (उपमहापौर) व मान्य सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोलमवाड यांच्या पत्नी असलेल्या संगीताताई बोलमवाड यांनी तब्बल 5,700 मतांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. 22 पैकी 15 नगरसेवक मराठवाडा जनहित पार्टीचे निवडून आल्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आमदार राजेश पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

ग्रुप लीडर ताहिर पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 13 जानेवारी रोजी उपनगराध्यक्षपदाची निवड होणार असून या पदासाठी शंकर बोलमवाड यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यामुळे एकाच घरातील पत्नी नगराध्यक्ष आणि पती उपनगराध्यक्ष अशी अभूतपूर्व घटना घडणार असून, धर्माबादच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हा एक नवा अध्याय ठरणार आहे.

मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोलमवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धर्माबाद शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी अहोरात्र काम केले आहे. युवकांची मोठी फळी उभी करत त्यांनी शहराच्या विकासासाठी एक स्वतंत्र राजकीय व्यासपीठ निर्माण केले. आमदार राजेश पवार यांनी महापालिका निवडणुकीत अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याने नाराज झालेल्या नागरिकांनी मराठवाडा जनहित पार्टीकडे विश्वासाने पाहिले.

ज्येष्ठ गुत्तेदार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष मोइजोद्दीन करखेलिकर, माजी सैनिक शेषराव पाटील फडसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी बोलमवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाम पाठिंबा दिला. जनतेने मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांवर विश्वास टाकत नगराध्यक्षपदासह 15 नगरसेवक निवडून दिले असून चार ते पाच नगरसेवकांचा पराभव झाला आहे.

नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संगीताताई बोलमवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असून, त्यानंतर शहरातील जनतेचे सार्वजनिक आभार मानत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

पत्नीला जनतेने नगराध्यक्ष बनवले आणि पक्षाच्या नगरसेवकांनी पतीला उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याने ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदवली जाईल, असे मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *