जिला
जिल्हा परिषदेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


नांदेड,१२- नांदेड जिल्हा परिषदेत आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते रातमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



