स्पेशल ओलंपिकमध्ये मालपाणी मतिमंद विद्यालयाचे उल्लेखनीय यश

नांदेड, दि. १२ रामटेक, नागपूर येथे दि. १० व ११ रोजी स्पेशल ओलंपिक भारत यांच्या मार्फत आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
कु. ऋतुजा संभाजी खरडे हिने पळत येऊन लांब उडी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवले. तर कु. अपेक्षा सुदाम दवणे हिने गोळाफेक स्पर्धेत द्वितीय पारितोषिक तसेच १०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले.
या यशाबद्दल विद्यार्थिनी, क्रीडा शिक्षक व विशेष शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमलकिशोर कोठारी,
सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, अंकित अग्रवाल तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले. त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.




