जिला

मुदखेड नगर परिषदेत ऐतिहासिक निर्णय; इम्रान मच्छीवाले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड नगर परिषदेत एका ऐतिहासिक निर्णयाची नोंद झाली असून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक इम्रान मच्छीवाले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

मुदखेड पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजातील व्यक्तीला या पदावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी संधी दिली.

मुदखेड नगर परिषदेच्या सभागृहात आज, १३ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता लोकनियुक्त नगराध्यक्षा विश्रांती माधव कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.

मुख्याधिकारी दळवी आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत इम्रान मच्छीवाले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. भाजपच्या एकूण १४ नगरसेवकांपैकी केवळ तीन नगरसेवक मुस्लिम समाजाचे असतानाही, इम्रान मच्छीवाले यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उपनगराध्यक्षपद देण्यात आले आहे.

खासदार चव्हाणांच्या या निर्णयामुळे मुदखेड शहरातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात एक सकारात्मक संदेश गेला अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात स्थान मिळाल्याने मुस्लिम बांधवांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

ही निवड म्हणजे मुदखेडच्या राजकीय आणि सामाजिक सलोख्याचा एक नवा अध्याय मानला जात असुन खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांचे मुस्लिम समाजाकडून अभिनंदन चा वर्षा होत आहे…

यावेळी नगराध्यक्ष विश्रांती कदम, गटनेता सुनिल शेटे, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम, तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख, भाजप शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, नगरसेवक सुनील शेट्टे, संजय आऊलवार, शाम चंद्रे, उपदे देवदे, अ. सत्तार कुरेशी, इम्रान मच्छीवाले, नगरसेविका शोभा बल्फेवाड, सविता मोडवान, निकीता सोनटक्के, शांताबाई चमकुरे , अतिया परविन अ सलाम , रेखा चौदते, प्रेमला पांचाळ यांच्या सह नितीन चौदंते, प्रभाकर पांचाळ, संजय सोनटक्के, प्रकाश बल्फेवाड, संदीप मोडवान, माधू चमकुरे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *