शहर

नांदेड महापालिका निवडणूक उद्या; पोलिंग पार्ट्या रवाना

नांदेड:-
नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी नेमलेल्या पोलिंग पार्ट्या आज आपल्या-आपल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या आहेत. उद्या गुरुवारी (दि. १५ जानेवारी) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

नांदेड शहरात एकूण २० प्रभाग असून त्यापैकी १९ प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत नांदेडकरांना एकूण ८१ नगरसेवक निवडायचे आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून जवळपास ४ हजार कर्मचारी आणि ३ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण ५ लाख १ हजार ७९९ मतदार असून त्यामध्ये २ लाख ५४ हजार ९९९ पुरुष, २ लाख ४६ हजार ६९६ महिला तसेच १०४ इतर मतदारांचा समावेश आहे. उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी शहरात ६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

मतदानासाठी लागणाऱ्या मतपेट्या, कंट्रोल युनिट, बॅलट युनिट तसेच अन्य साहित्य शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्राँग रूममधून कडक पोलीस बंदोबस्तात वितरित करण्यात आले आहे. येथून ६०० कंट्रोल युनिट, १६९६ बॅलट युनिट, शाई आणि इतर आवश्यक साहित्य वाहनांद्वारे संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आले आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना

मतदानाचा टक्का वाढावा, तसेच महिला मतदारांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *