महाराष्ट्रा
राज्यातील 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; मतदान प्रक्रियेला सुरुवात

राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचा धुरळा उडणार असून, 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला.

या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार तयारीला लागले आहेत. लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी, माघार तसेच मतदान आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेचे चित्र स्पष्ट होणार असल्याने या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



