जिला

शहराच्या विकासासाठी विश्वासात घेतल्यास समर्थन करण्यासाठी विचार करू – कांग्रेस गट नेता नाजेमा खातुन पठाण यांचे स्पष्टीकरण

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी उपाध्यक्ष तथा मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते कै. बंदे अली खा पठाण यांच्या सौभाग्यवती श्रीमती नाजेमा खातुन पठाण यांची नगर परिषदेत काँग्रेस पक्षाकडून गटनेते म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कायदेशीरपणे मान्यता देत निवड केली असून दैनिक जगमित्रच्या प्रतिनिधीशी प्रतिक्रिया देताना सांगितले की नगर परिषदेत एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी यांच्याकडे असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतल्यास काँग्रेस पक्ष पालिकेत सत्ताधारी भाजपला काही अंशी समर्थन करण्याची हमी यावेळी दिली.

मुदखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरातील जनतेने एकूण 20 सदस्य असलेल्या पालिकेत एकूण भारतीय जनता पार्टीचे 14 नगरसेवक आणि नगराध्यक्ष असून ,काँग्रेस पक्षाला 04 आणि एम आय एम पक्षाचे 02 नगर सेवक निवडून देत भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता देत पाच वर्षाचा कार्यकाळ पारदर्शकपणे सांभाळण्यासाठी हवाली केले मधल्या काळात निवडून आलेल्या सर्व

राजकीय पक्षांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेत कायदेशीरपणे नगरपरिषदेत आपल्या गटनेत्याची निवड करत त्यात एम आय एम पक्षाचे अमीर हमजा आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील शेट्टे यांची नगरपालिकेत गटनेते मधून वर्णी लावून घेतली.

याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक शेख अब्दुल कबीर नगरसेवक अविनाश चौदंते,नगरसेविका श्रीमती गोदावरीबाई बोकेफोड, माजी नगरसेवक गंगाधर डांगे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण, म.गौसभाई फुलवाले, युवा कार्यकर्ते बळाभाऊ, बोकेफोड बंधु इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *