क्रांतीकारी शिक्षक संघटनेतर्फे शाहीन बेगम यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

नांदेड : क्रांतीकारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील शाहीन बेगम अब्दुल रशीद, जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा, वाजेगाव यांना प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा ११ जानेवारी रोजी पुणे येथील आझम कॅम्पस, असेंब्ली हॉल येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंत चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष, क्रांतीकारी शिक्षक संघटना हे होते.
यावेळी व्यासपीठावर प्रा. नंदकुमार सागर (संचालक, समाज शिक्षण मंडळ, विंझर), शफी इनामदार (राज्य उपाध्यक्ष, क्रांतीकारी शिक्षक संघटना) उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्रीमती आबेदा इनामदार (अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणे) व हाजी शाहेद कादरी (संस्थापक सचिव) यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश वाघमारे (प.म. अध्यक्ष, क्रांतीकारी शिक्षक संघटना), हबीबुर्रहमान (राज्य सल्लागार, क्रांतीकारी शिक्षक संघटना), कामिल शेख (आदिल पब्लिकेशन्स, पुणे), अॅड. महेश लोहारे (संचालक, आय.आय.बी. इन्स्टिट्यूट, पुणे) तसेच अय्युब कादरी (मराठवाडा अध्यक्ष, क्रांतीकारी शिक्षक संघटना) आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहीन बेगम अब्दुल रशीद यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



