क्राईम

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचे लातूर व नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर छापे

अग्नीशस्त्रासह साडेतीन लाखांची रोकड, 27 मोबाईल व जुगार साहित्य जप्त

 

 

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम राबवली असून, त्यांच्या आदेशानुसार कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक लातूर व नांदेड येथे कारवाईसाठी पाठविण्यात आले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड व पाच अंमलदारांचा समावेश असलेल्या पथकाने दि. 27 जानेवारी 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक चौक परिसरात रमेश गिरी यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 1,05,200 रोख व सुमारे 70,000 किमतीचे 12 मोबाईल, असा एकूण 1,75,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 13 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गु.र.नं. 41/2026, कलम 4 व 5, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर दि. 30 जानेवारी 2026 रोजी पथकाने नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मच्छी मार्केट परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. येथे जुगार खेळणाऱ्या 25 व्यक्तींंकडून 2,34,100 रोख व 4,28,000 किमतीचे 27 मोबाईल असा एकूण 6,62,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु.र.नं. 32/2026, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याच कारवाईदरम्यान पथकाने जयकिशन उर्फ जय राजेशसिंह ठाकूर (वय 21, रा. उल्हासनगर, तरोडा नाका) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व 3 जिवंत काडतुसे असा 31,500 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरुद्ध गु.र.नं. 31/2026, कलम 3/25 शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये पथकाने एकूण 3,40,000 रोकड, सुमारे 5 लाख किमतीचे 39 मोबाईल, जुगार साहित्य तसेच एक गावठी अग्नीशस्त्र व 3 जिवंत काडतुसे, असा एकूण 8,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत सपोनि श्रीराम माचेवाड यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पो.कॉ. गणेश धुमाळ, पो.कॉ. कामाजी गवळी व पो.कॉ. विलास सुरवसे यांनी सहभाग घेतला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांसाठी ₹10,000 चे बक्षीस जाहीर केले आहे. संबंधित अवैध व्यवसायांना आणखी कोणाचे पाठबळ होते का, याचा तपास सुरू आहे.

नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच ‘खबर’ हेल्पलाईन 91 50 100 100 वर कळवावी, असे आवाहनही श्री. उमाप यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *