जिला
माहूर येथील शेख फरीद वज्रा (धबधबा) येथे बुडून किनवटच्या मुस्लिम तरुणाचा मृत्यू

किनवट: किनवटलगत असलेल्या गोकुंडा येथील 32 वर्षीय मुस्लिम तरुणाचा माहूर येथील शेख फरीद वज्रा (दर्गा परिसरातील धबधबा) येथे बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुंडा (ता. किनवट) येथील रहिवासी शेख इरशाद शेख शफी हे आज माहूर येथील शेख फरीद वज्रा दर्ग्यावर गेले होते. त्यावेळी पिण्याचे पाणी आणण्यासाठी जात असताना त्यांचा पाय घसरला आणि ते धबधब्यात कोसळले. पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे किनवट शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.



