क्राईम

नांदेड शहरात ATM फोडणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

 

नांदेड: शहरातील ATM फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नांदेड यांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ATM फोडण्यासाठी वापरलेले साहित्य व एक मोटारसायकल असा एकूण ₹1,06,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपी: राम मोहन कुरे (वय 26 वर्ष) रा. गागलेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड, सध्या मुक्काम – केक हाऊसजवळ, श्रीनगर, नांदेड


नांदेड जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणणे व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते.

दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 2.15 वाजता, पोउपनि मिलिंद सोनकांबळे व त्यांचे पथक रात्रगस्तीदरम्यान गोदावरी बँकेजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या ATM मध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली. तपास केला असता आरोपी ATM मशीन उघडून त्यातील रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न करताना आढळला.

त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने परिसरातील कोटक महिंद्रा बँकेचे ATM देखील फोडल्याची कबुली दिली.

पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी नितीन मिसाळ यांच्या फिर्यादीवरून
पो.स्टे. भाग्यनगर गु.र.न. 68/2026 कलम 324(4), 331(4), 305, 62 BNS अन्वये गुन्हा दाखल

कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी दत्ता राजगोरे यांच्या तक्रारीवरून
पो.स्टे. भाग्यनगर येथे संबंधित गुन्हा नोंद

जप्त मुद्देमाल : ATM फोडण्यासाठी वापरलेले साहित्य वापरलेली मोटारसायकल सदर आरोपीस जप्त मुद्देमालासह पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *