क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; हद्दपार इसमावर गुन्हा दाखल

 

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत हद्दपार करण्यात आलेल्या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचे नाव संघर्ष सुनिल पवळे (वय 25 वर्ष) व्यवसाय – बेकार रा. बळीरामपूर, नांदेड

पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत हद्दपार करण्यात आलेले इसम आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.

त्या अनुषंगाने Nanded Rural Police Station येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष पवळे याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

मा. उपविभागीय दंडाधिकारी, नांदेड यांनी कलम 56 (1) (ब) महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आदेश क्र. 2025/हद्दपार/एमएजी/सीआर-77/2025, दिनांक 22 डिसेंबर 2025 अन्वये त्यास सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले होते.

दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांनी तपासणी दरम्यान हद्दपार इसमाची पडताळणी केली असता संघर्ष सुनिल पवळे हा पोलीस ठाणे हद्दीत लपून-छपून वास्तव्य करताना आढळून आला. त्यावेळी त्याच्याकडून खंजीर जप्त करण्यात आला.

याप्रकरणी त्याच्यावर कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ./1628 देवडे हे करीत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *