हेल्थ

डॉ.प्रवीण खिल्लारे यांच्या मातोश्री केअर क्लीनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

नांदेड दि.२२ छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून डॉ. प्रवीण खिल्लारे यांच्या मातोश्री केअर क्लिनिक मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन वार्ड क्र. 3 च्या नगरसेविका मीनलताई गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरामध्ये जवळपास ७० पेक्षा जास्त रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

करण्यात आली सांगवी बु. परिसरातील अनेक रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी नगरसेविका मीनलताई पाटील म्हणाल्या की, असे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वारंवार घेत राहिल्याने गरीब रुग्णांना आपले आरोग्य अबाधित राखण्यासाठी मदत होते या शिबिरासाठी डॉ.प्रवीण खिल्लारे यांच्यासह अनिकेत ढगे,जितेंद्र कांबळे,कमलाकर भगत,अमित गाढे पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *