क्रांतिवीर समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विज्ञान दिन साजरा

पाटोदा दि. 1 येथील क्रांतीवीर समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनिदेशक विजय कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भटकर एस.एस.उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञानाची कास धरल्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवूनच समाजामध्ये आपले जीवन जगले पाहिजे तरच त्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध आणि संपन्न होत असते.
विज्ञान दिनाचा कार्यक्रम प्राचार्य एस.एस. परघणे यांच्या मार्गदर्शनाखाली गट निदेशक विजय कांबळे आयोजित केला होता. यावेळी प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राऊत एस.एस.,भुरके बी.एस. यांनी विशेष सहकार्य केले.



