खुनाचा प्रयत्न व खंडणी प्रकरणातील फरार आरोपी शस्त्रासह ताब्यात
भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई; १,००,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : खुनाचा प्रयत्न व खंडणी मागण्यासारखे गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या आरोपीस शस्त्रासह ताब्यात घेत भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १,००,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी बालाजी शिवाजी जाधव, वय ३१ वर्ष, व्यवसाय – खाजगी नोकरी, रा. दयानगर, नांदेड
गौस बेग उर्फ शेरा पि. रफीक बेग, वय ३० वर्ष, व्यवसाय – व्यापार, रा. निजाम कॉलनी, नांदेड
आकाश रघुनाथ माचनवाड, वय २० वर्ष, व्यवसाय – शिक्षण, रा. दरेगाव ता. मुदखेड जि. नांदेड, सध्या रा. स्नेहनगर पोलीस कॉलनी, नांदेड
जप्त मुद्देमाल लोखंडी खंजर – किंमत अंदाजे २०० रुपये, लोखंडी तलवार – किंमत अंदाजे ३०० रुपयेबजाज कंपनीची २२० पल्सर मोटारसायकल – किंमत अंदाजे १,००,००० रुपये एकूण जप्त माल : १,००,५०० रुपये
मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार, नांदेड यांनी “ऑपरेशन प्लस आऊट” अंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे गु.र.नं. ५८४/२५ कलम १०९, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) बीएनएस प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे, महेश माळी, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. विनोद देशमुख व अंमलदार आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान, गजानन महाराज कमानीसमोर सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम मोटारसायकलवर बसून हातात खंजर फिरवत व्यापारी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाठलाग करून दोघांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे बालाजी शिवाजी जाधव व गौस बेग उर्फ शेरा अशी सांगितली. दोघांकडून विनापरवाना बेकायदेशीररीत्या खंजर बाळगल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली.
तसेच, बालाजी शिवाजी जाधव हा भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ५८४/२०२५ मधील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास संबंधित गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
याशिवाय, पाण्याच्या टाकीजवळील एसबीआय बँक व एटीएमसमोर सार्वजनिक रस्त्यावर एका इसमाकडे विनापरवाना तलवार आढळून आल्याने त्याच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
भाग्यनगर गुन्हे शोध पथकाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे.



