दक्षिण मध्य रेल्वे : रायनापाडू यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी लाईन ब्लॉक
विजयवाडा विभागातील काही गाड्या रद्द; काहींचा मार्ग बदल
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागातील विजयवाडा–दुव्वाडा विभागात रायनापाडू स्थानकावरील यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामासाठी प्री-एनआय लाईन ब्लॉक दि. 28.04.2026 ते 01.05.2026 (04 दिवस) दरम्यान तर एनआय लाईन ब्लॉक दि. 02.05.2026 ते 05.05.2026 (04 दिवस) दरम्यान घेण्यात येणार आहे.
या कालावधीत खालील रेल्वे गाड्या रद्द व मार्ग बदल करण्यात येणार आहेत.
१) रद्द करण्यात आलेल्या गाड्या
20809 संबलपूर – नांदेड
रद्द दिनांक : 01.05.2026, 03.05.2026 व 04.05.2026
20810 नांदेड – संबलपूर
रद्द दिनांक : 02.05.2026, 04.05.2026 व 05.05.2026
20811 विशाखापट्टणम – नांदेड
रद्द दिनांक : 02.05.2026
20812 नांदेड – विशाखापट्टणम
रद्द दिनांक : 03.05.2026
२) मार्ग बदल करण्यात आलेल्या गाड्या
17208 मछलीपट्टनम – साईनगर शिर्डी एक्सप्रेस
दिनांक : 05.05.2026
वळवलेला मार्ग : विजयवाडा – कृष्णा कॅनल – गुंटूर – पगिडिपल्ली जंक्शन
वगळलेले थांबे : मधिरा, खम्मम, दोरनाकल जंक्शन, महबूबाबाद, वारंगल, काझीपेट जंक्शन
17406 आदिलाबाद – तिरुपती
दिनांक : 04.05.2026
वळवलेला मार्ग : पगिडिपल्ली जंक्शन – गुंटूर – तेनाली जंक्शन
वगळलेले थांबे : भोंगिर, यादाद्री, आलेर, जनगांव, रघुनाथपल्ली, काझीपेट, वारंगल, नेकोन्डा, घनापूर, केसामुद्रम, महबूबाबाद, गार्ला, दोरनाकल जंक्शन, खम्मम, बेगुनकोडोर, मधिरा, एरूपालेम, विजयवाडा, पेद्दावडलापुडी, दुगिराला
17405 तिरुपती – आदिलाबाद
दिनांक : 05.05.2026
वळवलेला मार्ग : तेनाली जंक्शन – गुंटूर – पगिडिपल्ली जंक्शन
वगळलेले थांबे : दुग्गिराला, पेद्दावडलापुडी, विजयवाडा, कोंडापल्ली, एरूपालेम, मधिरा, बोनाकालू, खम्मम, दोरनाकल, गार्ला, महबूबाबाद, केसामुद्रम, नेकोन्डा, वारंगल, काझीपेट, घनापूर, रघुनाथपल्ली, जनगांव, आलेर, यादाद्री, भुवनगिरी
12787 नरसापूर – नगरसोल
दिनांक : 02.05.2026, 04.05.2026 व 05.05.2026
वळवलेला मार्ग : विजयवाडा – कृष्णा कॅनल – गुंटूर – पगिडिपल्ली जंक्शन
वगळलेले थांबे : खम्मम, महबूबाबाद, वारंगल, काझीपेट जंक्शन
मार्ग बदलामुळे संबंधित स्थानकांवरील काही थांबे तात्पुरते रद्द राहतील. रेल्वे प्रशासन प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संबंधित रेल्वे स्थानक किंवा अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.



