क्राईम

परभणी–अकोला येथे आरपीएफची धडक कारवाई; १७ वर्षीय मुलाचीही सुरक्षित सुटका

नांदेड विभागात ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन रेल सुरक्षा आणि ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत प्रवासी सुरक्षा मोहिमांमध्ये आरपीएफची मोठी कामगिरी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) ने ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन रेल सुरक्षा आणि ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत अलीकडे राबविण्यात आलेल्या प्रभावी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करणे या बाबतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत 07.03.2026 रोजी गाडी क्रमांक 17630 नांदेड–हडपसर एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेचा आरपीएफ, जीआरपी आणि सीआयबी पथकाने संयुक्त कारवाई करून यशस्वी उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी ला प्लॅटफॉर्म क्रमांक 04 जवळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे १७.५७ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, अंदाजे 43,700 किंमतीची, जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी ती सरकारी रेल्वे पोलिस (GRP) यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

याशिवाय 08.03.2026 रोजी पिंगळी रेल्वे स्थानकाजवळ आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान चार मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि तीन धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे 1.80 लाख आहे. आरोपींना जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *