जिला

जिल्हा परिषदेची 13 मार्च रोजीची पेन्शन अदालत रद्द

नांदेड, दि.11- जिल्हा परिषद नांदेड येथे दिनांक 13 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली पेन्शन अदालत रद्द करण्यात आली आहे.

     दिनांक 13 मार्च 2026 रोजी अर्थ विभागाच्या वतीने बजेट संदर्भात महत्त्वाची पूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना उपस्थित राहणे आवश्यक असल्यामुळे पेन्शन अदालत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

     त्यामुळे 13 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली पेन्शन अदालत रद्द करण्यात आली असून या पेन्शन अदालतीचा सुधारित दिनांक व वेळ पुढील काळात स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच ही माहिती विविध विभागांमार्फत सर्व संबंधित सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटनांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *