क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई : अवैध देशी दारू विक्री करणारा इसम ताब्यात, 56,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड : अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेत 56,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (नांदेड) यांनी “ऑपरेशन फ्लश आउट” अंतर्गत विनापरवाना देशी दारू व अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार बोढार बायपास परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम मोटारसायकलवरून विनापरवाना देशी दारू चोरट्या पद्धतीने विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गाडेगाव परिसरात सापळा रचून मोटारसायकल क्रमांक MH-26 CN-5140 चा चालक ताब्यात घेतला. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव जळबा गंगाधर मेकाले (वय 26, व्यवसाय मजुरी, रा. पिंपळगाव (महादेव) ता. अर्धापूर, जि. नांदेड) असे सांगितले.

आरोपीच्या ताब्यातून देशी दारू ‘भिंगरी संत्रा’च्या 180 मि.ली. क्षमतेच्या 96 सिलबंद बाटल्या (प्रत्येकी 80 रुपये – एकूण 7,680 रुपये) तसेच 90 मि.ली. क्षमतेच्या 100 सिलबंद बाटल्या (प्रत्येकी 40 रुपये – एकूण 4,000 रुपये) मिळून आल्या. तसेच TVS ज्युपिटर कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कुटी (क्रमांक MH-26 CN-5140) किंमत अंदाजे 45,000 रुपये असा एकूण 56,680 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *