शहर

नांदेड-वाघाळा महापालिकेत स्वकृती सदस्यपदाची चुरस; शेख बिलाल, मुन्ना अब्बास व मोहम्मद नासेर यांचे अर्ज दाखल

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील स्वकृती सदस्य पदासाठी आज विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. या निवडीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात या पदाबाबत अडीच-अडीच वर्षांच्या सूत्रावर सहमती झाली आहे. या करारानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अॅड. शेख बिलाल यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी काँग्रेसच्या वतीने मुन्ना अब्बास हे काफ सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक राजकीय वर्तुळात काँग्रेस आणि वंचित यांच्यात झालेल्या या समझोत्याला महत्त्व दिले जात आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि महानगरपालिकेत समन्वयाने काम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (मजलिस) पक्षाच्या वतीनेही या पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मजलिसच्या वतीने माजी नगरसेवक मोहम्मद नासेर यांना स्वकृती सदस्य पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मोहम्मद नासेर हे यापूर्वीही महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय राहिले असून त्यांना स्थानिक पातळीवर अनुभवी नेते म्हणून ओळखले जाते.

आज अॅड. शेख बिलाल, मुन्ना अब्बास आणि मोहम्मद नासेर या तिन्ही उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. या वेळी संबंधित पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घडामोडींमुळे नांदेड शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *