जिला

दिव्यांग संघटनेने आंदोलनाचा इशारा देताच मनपा प्रशासन जागी…

दिव्यांगाचा निधी 31 मार्च पूर्वी खर्च करणार दिले संघटनेला आश्वासन....

 

नांदेड प्रतिनिधी / नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांचा राखीव निधी अद्यापही महानगरपालिकेने खर्च केला नाही. दिव्यांगांना सोयी सुविधा व निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने महानगरपालिकेला आंदोलनाचा इशारा देताच 31 मार्च 2026 पुर्वी दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करणार असल्याचे उपआयुक्त अभिजित वायकोस यांनी संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांना आज लेखी पत्र देऊन सांगितले आहे.

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने वारंवार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन दिव्यांगांचा राखीव 5% निधी खर्च करण्यासाठी आंदोलन केले परंतु महानगरपालिकेने अद्यापही दिव्यांगांचा राखीव 5 टक्के निधी खर्च केला नाही. त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त व महापौर यांना घेराव आंदोलनाचा इशारा देताच महानगरपालिकेचे उपआयुक्त अभिजित वायकोस यांनी अध्यक्षांना त्वरित 5% निधी खर्च करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *