शहर

माळटेकडी रोडवरील हैदरबाग गल्ली नं. २ मधील लोखंडी कमान हटवा : बशीर लाला

 

नांदेड, दि. २ मार्च-
शहरातील माळटेकडी रोडवरील हैदरबाग गल्ली नं.२ मध्ये विनाकारण लोखंडी कमान बसविण्यात आली आहे. या लोखंडी कमानीमुळे अंत्ययात्रा नेतांना मोठी कसरत करावी लागत आहे, तर रुग्णवाहिका देखील नेता येत नसल्याने मोठी अडचण होत असुन ही कमान तातडीने हटवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख बशीर लाला यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ही कमान मनपाने नाही तर तेथील एक-दोघांनी विनापरवानगी बसवलेल असुन या लोखंडी कमानीमुळे अंत्ययात्रा नेतांना मोठी कसरत करावी लागत आहे, तर रुग्णवाहिका देखील नेता येत नसल्याने मोठी अडचण होत आहे. देगलूर नाका येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने रुग्णालयात जाण्याचा हा जवळचा आणि रहदारीमुक्त रस्ता असल्याने या रस्त्याचा वापर करण्यात येतो.

परंतु लोखंडी कमानीमुळे रुग्णवाहीका, स्कुल बसेस जाण्यास अडचण होत असून, ही कमान तातडीने हटवावी तसेच या रस्त्यावर जवळपास २० गतिरोधक विनापरवानगी टाकण्यात आले आहेत. तर याच मार्गावरील दुसर्‍या गल्लीत माय फिटनेस जिम नावाने जिम सुरु करण्यात आली आहे.

परंतु जिम मालकाने पार्किंगची कुठलीही व्यवस्था केली नाही. जिममध्ये येणारे सदस्यांच्या दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून विशेष करुन शाळकरी विद्यार्थ्यांना, रुग्णवाहीका जाण्यास अडचण होत असुन, ही जिम देखील बंद करावी असेही शेख बशीर लाला यांनी निवेदनात नमुद केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *