जिला

लोहा : जामा मस्जिदमध्ये शिवसेनेतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

लोहा – पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने शहरातील जामा मस्जिद येथे माजी आमदार तथा शिवसेना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख रोहीदास चव्हाण यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

यावेळी उपनगराध्यक्ष करीमभाई शेख, गटनेते भास्कर पा. पवार, नगरसेवक पंकज परिहार, शिवसेना तालुका प्रमुख भिमराव पा. शिंदे, माजी नगरसेवक शरफोद्यीन शेख, संभाजी पाटील चव्हाण, अनिल दाढेल, युनूस शेख, शेख सिकंदर, शेख सुलतान, गजानन दांगटे आदी मान्यवर उपस्थित होते.

इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिला. छाया : विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *