मुक्ता कदम प्रकरणी मुदखेड पत्रकार संघाचा निषेध; गुन्हा मागे घेण्याची मागणी

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ग्राउंड रिपोर्टींग केल्याबद्दल पत्रकार मुक्ता कदम यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याविरोधात मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत निवेदन देत हा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
नांदेड महानगरपालिका – २०२६ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीटंचाई, अस्वच्छता, आरोग्य, शिक्षण व रस्त्यांचा प्रश्न इ. मुलभूत प्रश्नांवर बोट ठेवत वृतांकन केल्यानंतर दोन महिन्यांनीच मुक्ता कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हणत खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातील भोकर मतदार संघातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, माजी जिल्हा संघटक प्रतापराव देशमुख, संदीपकुमार देशमुख, रुकमाजी शिंदे, दिनेश शर्मा, अतिक अहमद, उत्तम हनुमंते, गंगाधर डांगे, जयराम वने, साहेबराव गागलवाड, साहेबराव हौसरे, संतोष सावंत, हाफिज खुरेशी, व्यंकटी मुंगल, मोहम्मद हकीम,संतोष दर्शनवाड,
आदी पत्रकार उपस्थित होते.



