हजारों दिव्यांगांची माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केली निराशा…
शब्द देऊनही पाळला नाही....
नांदेड प्रतिनिधी :
जिल्हाभरातील व शहरातील दिव्यांगांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं व महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी व वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाव्यात यासाठी हजारो दिव्यांगांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना विनंती करून दिव्यांगांमधून एक स्वीकृत सदस्याची नियुक्ती करावी यासाठी साकडं घातले होते. माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण यांनी दिव्यांगांना शब्द दिला होता परंतु तो पाळला नसून दुसऱ्याच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी हजारो दिव्यांगांची निराशा केली आहे.
महानगरपालिका अंतर्गत हजारो दिव्यांग बाधव व भगिनी शहरात वास्तव्यात आहेत या दिव्यांगांना आद्यापही महानगरपालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत. अनेक दिव्यांगांना शासनाच्या महानगरपालिकेकडून योजना दिल्या जात नाहीत. 31 मार्च संपत येत आहे परंतु अद्यापही महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांचा राखीव पाच टक्के निधी खर्च केला गेला नाही हा निधी खर्च करावा. दिव्यांगांना विविध योजना मिळाव्यात, दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सभागृहात आवाज उठविला जावा यासाठी एका दिव्यांग स्वीकृत सदस्यांची महानगरपालिकेमध्ये अत्यंत गरज आहे परंतु स्विकृत सदस्यांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे दिव्यांगांना नेतृत्व करण्याची संधीच उपलब्ध झाली नाही. माझी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिव्यांगांना शब्द देऊन तो पाळला नसल्यामुळे हजारो दिव्यांगांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
दिव्यांगांच्या वतीने राहुल साळवे यांना स्वीकृत सदस्य पदावर नियुक्ती करावी यासाठी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे वारंवार भेटी घेऊन निवेदने दिले परंतु साळवे यांची स्वीकृत सदस्य पदी निवड झालेली नाही. त्यामुळे हजारो दिव्यांगांमध्ये तीव्र नाराजी होताना दिसत आहे



