शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न..
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मागील विविध वर्षांतील शंभरहून अधिक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती.
अर्धापूर :- उध्दव सरोदे /
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.मागील विविध वर्षांतील शंभरहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजय टेंगसे हे होते तर विचार मंचावर मेळाव्याचे समन्वयक डॉ.रघुनाथ शेटे,डॉ.साईनाथ शेटोड,डॉ.जे.सी. पठाण,डॉ.विक्रम कुंटूरवार,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अॅड.अमोल देशमुख,सचिव गजानन भवानकर , अँड गौरव सरोदे,अमोल सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये परस्पर स्नेहबंध दृढ व्हावेत,महाविद्यालयाशी असलेला ऋणानुबंध जपला जावा आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी विद्यार्थी दत्ता बारसे,गोपीनाथ कल्याणकर,जयंत कल्याणकर, रूपाली कांबळे,तुकाराम कराळे, संघरत्न सरोदे,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये महाविद्यालयातील शिक्षणकाळातील आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे मार्गदर्शन व महाविद्यालयाने दिलेल्या संस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करून सर्वांना एकत्र आणण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घडणीत या महाविद्यालयाचे सर्वात मोठे व महत्त्वाचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.अजय टेंगसे यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला व महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.
या मेळाव्यास डॉ.जे.सी. पठाण,विक्रम कुंटूरवार व ईतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेळाव्याचे समन्वयक डॉ.रघुनाथ शेटे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डाॅ.काजी मुख्तारोद्दिन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.साईनाथ शेट्टोड यांनी मानले.या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉ.बिराजदार, डॉ.निळकंठ लांडे,डॉ.विनोद शिंदे, डॉ.परमेश्वर पौळ,डाॅ.दिनानाथ बिच्चेवार,डॉ.बालाजी आव्हाड यांनी विशेष सहकार्य केले.



