देश विदेश

उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी हजूर साहिब नांदेड – आसनसोल दरम्यान विशेष रेल्वेगाडी

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागामार्फत हजूर साहिब नांदेड – आसनसोल दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 07701 हजूर साहिब नांदेड – आसनसोल विशेष ही गाडी दि. 21 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी हजूर साहिब नांदेड (23:50 वाजता) येथून सुटेल व आसनसोल (12:00 वाजता) येथे गुरुवारी पोहोचेल.

ही गाडी मार्गातील खालील स्थानकांवर थांबेल :
पूर्णा (02:20 वाजता), हिंगोली (03:52 वाजता), वाशिम (04:52 वाजता), अकोला (06:50 वाजता), बडनेरा (08:32 वाजता), नागपूर (12:10 वाजता), गोंदिया (14:15 वाजता), दुर्ग (16:35 वाजता), रायपूर (17:30 वाजता), बिलासपूर (19:45 वाजता), झारसुगुडा (23:35 वाजता), राऊरकेला (01:55 वाजता), टाटानगर (07:20 वाजता), चांदिल (08:32 वाजता) आणि पुरुलिया (09:42 वाजता).
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07702 आसनसोल – हजूर साहिब नांदेड विशेष ही गाडी दि. 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी आसनसोल (14:00 वाजता) येथून सुटेल व हजूर साहिब नांदेड (00:45 वाजता) येथे शनिवारी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी आसनसोल (14:00 वाजता) येथून सुटून पुरुलिया (16:02 वाजता), चांदिल (17:02 वाजता), टाटानगर (18:30 वाजता), राऊरकेला (22:35 वाजता), झारसुगुडा (00:35 वाजता), बिलासपूर (04:15 वाजता), रायपूर (06:02 वाजता), दुर्ग (06:55 वाजता), गोंदिया (09:15 वाजता), नागपूर (11:35 वाजता), बडनेरा (15:05 वाजता), अकोला (18:30 वाजता), वाशिम (19:52 वाजता), हिंगोली (20:52 वाजता) आणि पूर्णा (22:50 वाजता) येथे थांबून हजूर साहिब नांदेड (00:45 वाजता) येथे पोहोचेल.

या गाडीमध्ये एकूण 24 डबे असतील. त्यामध्ये 02 एसी टू टियर, 06 एसी थ्री टियर, 10 स्लीपर क्लास, 04 जनरल सेकंड क्लास आणि 02 एसएलआर डबे असतील. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घ्यावा व प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करून नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *