रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणातील आरोपी अटक:

ऑपरेशन रेल सुरक्षा अंतर्गत दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सुमारे ११:१५ वाजता, परभणी रेल्वे स्थानक यार्ड परिसरात रेल्वे मालमत्ता चोरी करणाऱ्यांवर गुप्त नजर ठेवताना श्री अमोल वावळे, पोलीस उपनिरीक्षक , रेल्वे सुरक्षा बल आणि श्री महेंद्रसिंग चव्हाण, हेड कॉन्स्टेबल यांनी एका संशयित व्यक्तीस पकडले.
या व्यक्तीचे नाव राधे राहणार परभणी असे असून त्याच्याकडे ५२ किलो फिश प्लेट (१ मीटर) आणि ३ पेंड्रोल क्लिप असलेली पॉलिथिनची पिशवी आढळली. या मालाबाबत त्याच्याकडे कोणतेही वैध अधिकृत कागदपत्र किंवा पावती नव्हती. पंचांसमक्ष चौकशी केल्यानंतर त्याने यार्ड परिसरातील ट्रॅकजवळून ही रेल्वे मालमत्ता चोरी केल्याची कबुली दिली.
आरपीएफ पथकाने जप्ती-चौकशी पंचनामा तयार करून संबंधित रेल्वे मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आरोपीस जप्त मालासह सुमारे १६:४० वाजता आरपीएफ पोस्ट परभणी येथे आणून सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणी परभणी पोस्ट गुन्हा क्र. ०१/२०२६, रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) अधिनियम १९६६ च्या कलम ३(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
या दोन्ही कारवायांमुळे आरपीएफ नांदेड विभाग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणासाठी सातत्याने दक्षतेने काम करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



