जिला

महामानवाच्या जयंतीनिमित्त शांतता व अनुशासन पाळा – उपविभागीय पोलीस अधिकारी संजीवन मिरकले

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव हा केवळ जल्लोषाचा विषय नसून त्यांच्या महान विचारांचे आचरण करण्याची ही एक मौल्यवान संधी आहे. समाजाने डीजेचा मर्यादित व जबाबदारीने वापर करावा, कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे, आणि कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घ्यावी. शांतता, बंधुभाव व सामाजिक जाणीव जपत महामानवांचा जयंती सोहळा उत्साहपूर्ण ,मंगलमय वातावरणात साजरा करावा हीच खरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन अर्धापूर ग्रामीण उपविभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजीवन मिरकले यांनी केले.

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 20 एप्रिल रोजी शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस तहसीलदार डॉ. आनंद देऊळगावकर, पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण ,यांची प्रमुख उपस्थिती होती.शहर व तालुक्यातील विविध जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून नियोजनासंदर्भात आपले मुद्दे मांडले. बैठकीच्या प्रारंभी विविध जयंती मंडळांकडून संभाव्य अडचणी, मिरवणूक मार्ग, ध्वनीप्रदूषण, वाहतूक व्यवस्था यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासनाच्या वतीने सर्व बाबींचा विचार करून योग्य त्या उपाययोजना आखण्यात आल्या. जयंती मिरवणुका शांततेत आणि शिस्तीत पार पडाव्यात यासाठी आवश्यक त्या सूचना पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी दिल्या .

नगरपरिषद, महावितरण, तसेच इतर संबंधित शासकीय विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश या बैठकीच्या निमित्ताने तहसीलदार डॉ. आनंद देऊळगावकर यांनी दिले. विजेचा अखंडित पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा आणि आपत्कालीन सेवांची तत्परता, यावर विशेष भर देण्यात आला. पोलीस प्रशासनानेही सर्व स्तरावर बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची ग्वाही या बैठकीच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी दिली.
यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहिमा, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रम यांद्वारे समाजाला सकारात्मक दिशा देण्यावर भर देण्यात आला.

या शांतता समितीच्या बैठकीस जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती संजयआ ऊल वार, नगरसेवक अविनाश चौदंते, पोलीस पाटील राजेंद्र हामंद, आमदुरा येथील पोलीस पाटील प्रतिनिधी पंजाब पाटील पवार, ,चिलपिंपरीचे पोलीस पाटील,गंगाधर कोलते , वासरी येथील महिला पोलीस पाटील शुभांगी पाटील, कोल्हा येथील पोलीस पाटील कीर्ती यादव ,मुदखेड येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता काळे ,नगरपरिषदेचे प्रतिनिधी दिलीप पवार, रमेश सावंत ,ग्रामीण रुग्णालयाचे प्रतिनिधी घुले, भीम नगर येथील जयंती मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, उर्फ पेंटर, राजू चौदंते, रोहन चौदंते,

अविनाश चौदंते, अश्वजीत चौदंते, सचिन चौदंते, दिनेश एडके, पांडुरंग कोलते, जयपाल कोलते ,दिनेश एडके ,पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते, ज्येष्ठ पत्रकार उत्तम हनुमंते, धम्मदाता कांबळे ,साहेबराव गागलवाड, सिद्धार्थ चौदंते,हाफिस कुरेशी , राहुल कोलते, अजय कांबळे ,यांच्यासह शहरातील व मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध जयंती मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस पाटील , नागरिक उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार संजय कोलते यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *